Maharashtra Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात रेड अलर्ट…! हवामान विभागाचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत रेड अलर्ट, तर संपूर्ण मराठवाडा विभागासाठी यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी दिला आहे.

तसेच रेड अलर्ट दिलेल्या काही भागांत अतिवृष्टीमुळे पाणी साचण्याचा धोका आहे, तर काही भागांत वादळी वाऱ्यामुळे झाड पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

जोरदार पावसाची शक्यता

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने येत्या ४८ तासांत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्वच भागांत रेड अलर्ट ( अतिवृष्टी) होण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील काही भागांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने कोकण आणि गोवा परिसरातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी रेड अलर्ट ( अतिवृष्टी) होण्याची शक्यता आहे.

विजांच्या कडकडाटाची शक्यता

मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी रेड अलर्टची (अतिवृष्टी) शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्याला यलो अलर्ट

मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.विदर्भातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह रेड अलर्ट ( अतिवृष्टी) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सर्वाधिक पाऊस कोयना परिसरात

परिसरात सर्वाधिक पाऊस राज्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस हा कोयना परिसरात पडला ६. कोयना परिसरात १८७ आहे. मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. त्याखालोखाल डुंगरवाडी १८३ मिमी, दावडी १६८ मिमी, १८३ मिमी, दावडी १६८ मिमी, ताम्हिणी घाट परिसरात १६० मिमी, खंड १५० मिमी, भोर १४६ मिमी, लोणावळ्यामध्ये १३४ मिमी, शिरगाव १३० मिमी, अंबोने १३० मिमी, भिवपुरी १३० मिमी, भिरा १२६ मिमी, खोपोली १२२ मिमी, तर लवासा ६९.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.