Water Storage : कोपरगावला पुन्हा एकदा तीत्र पाणीटंचाई भेडसावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेऊन नगरपालिकेने आणखी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता शहरात आठणऐेवजी दर १० दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे. १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. पालिकेकडून सोमवारी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप व पाणीपुरवठा विभागाचे लिपिक स्वप्निल जाधव यांनी दिली.
‘कोपरगावला पाणी पुरवणार्या नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोरे समूहातील धरणांत ३१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी जून-जुलै महिन्यापर्यंत पुरावे, या दृष्टीने १० दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय कोपरगाव नगरपालिकेने घेतला आहे.
कोपरगावला दर महिन्याला ५ दलघमी इतके पाणी लागते. त्यामुळे हे पाणी १० दिवसाआड वितरित करूनही जून महिन्यापर्यंत पुरेल इतके राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे; मात्र जून- जुलैमध्ये पाऊस न पडल्यास कोपरगाव शहराची अवस्था आणखी बिकट होऊ शकते.
पालिकेच्या वतीने नागरिकांना सूचित करण्यात आले आहे की, धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागामार्फत पाणी काटकसरीने वापरण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. डाव्या कालव्याद्वारे येणारे आवर्तन उशिरा सोडणार असल्यामुळे पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी दि. २१९ पासून होणारा पाणी पुरवठा हा १० दिवसाआड करण्यात येत आहे.
नागरीकांनी पाणी जपून वापरावे व आपल्या भागात असलेल्या विधन बिहीरीचा पाण्यासाठी वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा व नगरपरीषद प्रशासन लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत आहे. याबाबत सवांनी नोंद घ्यावी व नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तीव्र उन्हाळ्याचे आगामी ७० दिवस चरणातील ३१ टक्के पाणी साठपावरच काढावे लागणार आहेत. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने ने होत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. धरणांतील जलसाठ्याचे घटते प्रमाण सध्या चिंतेचा विषय बनला आहे.
आज धरणांमध्ये गतवर्षांपेक्षा १० हजार दशलक्ष घनफूट जलसाठा कमी आहे. गेल्या वर्षी एप्रिलच्या प्रारंभी धरणात ३० हजार ५४० दशलक्ष घनफूट (४६.५१ टक्के) जलसाठा होता. चालू वर्षी एक-दोन धरणांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच धरणांतील साठा निम्म्याहून कमी झाला आहे, असे पाटबंधारे खात्याच्या वतीने कळवले आहे.
दिनांक १९ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार कोपरगाव नगरपालिके च्या क्रमांक एक तलावात तीन इंच तीन सेंटीमीटर, क्रमांक दोन तलावात चार इंच नऊ सेंटीमीटर, क्रमांक तीन तलावात दोन इंच दहा सेंटिमीटर व क्रमांक चार तलावात चार इंच सहा सेंटीमीटर इतके पाणी साठलेले आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करताना मोठी कसरत करावी लागत आहे, असे उप मुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के तूट
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच लहान-मोठ्या २३ धरणांत २० हजार ५६१ दशलक्ष घनफूट (३१.३१ टक्के) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ टक्के के साठा कमी आहे. गंगापूर धरणात ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी पाटबंधारे खात्याची आकडेवारी आहे.
पाणीपुरवठ्याचे चार टप्पे
नगरपालिकेने नियोजन तक्त्यात पाच भाग तयार केले आहेत. त्यानुसार दि. २१ ते २५ पाणीपुरवठा केला जाईल, २६ ते १ मेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. दि. २ ते ६ मे रोजी दुसऱ्या टप्प्यात पाणीपुरवठा केला जाईल. दि. ७ ते १२ मेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. तिसऱ्या टप्प्यात १३ ते १७ मे पाणीपुरवठा केला जाईल. दि. १८ ते २३ मे पाणीपुरवठा बंद राहील. चौथ्या टप्यात २४ ते २८ में या दरम्यान पाणीपुरवठा केला जाईल.
निळवंडेच्या पाण्याची आठवण
श्री साईबाबांच्या कृपेने एकही पैशाचा खर्च न होता कोपरगावच्या दारापर्यंत पाणी येत होते; मात्र केवळ श्रेयवादामुळे व काहींच्या अट्टहासामुळे दूर गेलेल्या निळवंडेच्या पाण्याची कोपरगावकरांना पुन्हा एकदा आठवण झाली आहे.