तापमान ३८ अंशावर; उद्या नगर जिल्ह्यात यलो अलर्ट

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहर व परिसरात मंगळवारी तापमानात १ अंशाने वाढ झाली. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी कडक उन्हामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. मंगळ वारी शहराचे तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात कुठेही पावसाची नोंद नाही. मात्र गुरुवारी, ११ एप्रिल ला जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत होती. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहराचे तापमान सहा अंशाने वाढले होते. त्यामुळे शहराचा पारा ३८ अंशावर गेला होता.

शुक्रवारी देखील शहराचे तापमान ३८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. शनिवारी मात्र तापमानात एक अंशाने घसरण झाली. रविवारी देखील तापमानात घट झाली होती. न्यू आर्टस् महाविद्यालयात बसवण्यात एनालायझर आलेल्या यंत्रामध्ये मंगळ वारी शहराचे तापमान ३८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे..

७ ते ९ एप्रिल या कालावधीत नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला होता. गेल्या दोन दिवसात मात्र कुठेही पावसाची नोंद नसली तरी ११ एप्रिलला हवामान विभागाने नगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe