Ahmednagar Rain : राज्य सरकारने पावसाची प्रतीक्षा न करता धरण क्षेत्रावर कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Rain : निम्म्याहून अधिक पावसाळा सरला आहे, धरणे अजूनही भरलेली नाहीत. निसर्ग सगळे अंदाज खोटे ठरवीत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावसाची प्रतीक्षा न करता किमान धरण क्षेत्रावर तरी कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज आहे.

दरवर्षी मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगरची धरणे खाली पाणी सोडूनही १५ ऑगस्टपूर्वीच ओसंडून वाहतात. यंदा मात्र धरणे भरणे तर दूरच गवतसुद्धा सुकले आहे. रोज काळेभोर आभाळ दाटून येते; मात्र पसार होते. जोराचे वारे वाहत आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरणी करूनही पिकांची शाश्वती राहिलेली नाही शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट होण्याची शक्यता आहे. नाशिक, नगरची धरणे पूर्ण भरलेली नसली तरी समन्यायी कायद्याप्रमाणे नाशिक व नगरमधील धरणांतून मराठवाड्याला पाणी सोडावे लागणार आहे. यातून प्रादेशिक वाद उफाळून अराजकता माजण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता पावसाची प्रतीक्षा न करता किमान धरण क्षेत्रात तरी कृत्रिम पावसाचा प्रयोग करून दुष्काळाची दाहकता कमी करण्याची आवश्यकता आहे.

पाऊस पाडण्यासाठी ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते. ढगांमधलं बाष्पाचं प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केलं की त्याचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं.

काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडणे म्हणजेच कृत्रिम पाऊस. पावसाच्या थेंबांची निर्मिती नैसर्गिकरीत्या थांबते, तेव्हा ती कृत्रिमरीत्या घडवून आणावी लागते. त्यासाठी काळ्या ढगांवर सोडियम क्लोराईड म्हणजेच मिठाचे कण फवारले जातात. एकदा ही क्रिया सुरू झाली की पाऊस पडायला सुरुवात होते.

काळ्या ढगांप्रमाणेच अधिक उंचीवर असलेल्या पांढऱ्या ढगांमधूनही पाऊस पाडता येतो. त्यासाठी सिल्व्हर आयोडाईड फवारले जाते. अमेरिका, इस्रायल, चीन, कॅनडा, रशिया, आफ्रिका आणि युरोपातील काही देशांमध्येसुद्धा असे प्रयोग केले जातात.