Unseasonal Rain:- सध्या जर आपण राज्यातील वातावरणाचा विचार केला तर दिवसा बऱ्याच प्रमाणात उकाडा वाढला आहे तर रात्री आणि सकाळी थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. एवढेच नाही तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील दिसून येत आहे.
तसेच मागील काही दिवसा अगोदर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली व काही ठिकाणी गारपीट देखील झाली होती.
अगदी याच पार्श्वभूमीवर संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाची शक्यता देखील ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
25 ते 29 फेब्रुवारी दरम्यान विदर्भातील 11 जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या राज्यामध्ये कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण व दिवसा कडक ऊन अशी वातावरणाची स्थिती असून या पार्श्वभूमीवर 25 ते 29 फेब्रुवारी दरम्यान विदर्भातील ११ जिल्ह्यात ढगाळ वातावरण व त्यासोबतच अवकाळी पावसाची शक्यता असल्याची माहिती जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
एवढेच नाही तर 25 ते 27 फेब्रुवारीच्या दरम्यान विजांच्या गडगडाटासह मध्यम पावसासोबत गारपिट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
प्रामुख्याने विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली तसेच भंडारा व अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये ही शक्यता जास्त असल्याचे देखील माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.
मराठवाड्यात कशी राहील परिस्थिती?
मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील संपूर्ण आठ जिल्ह्यांमध्ये 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान केवळ ढगाळ वातावरण राहून विजांचा गडगडाट व सोसायटीच्या वाऱ्यासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
ही शक्यता खास करून मराठवाड्यातील परभणी तसेच नांदेड, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांमध्ये अधिक असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
मध्य महाराष्ट्रात कशी राहिली स्थिती?
26 आणि 27 फेब्रुवारी दरम्यान अहमदनगर, नासिक तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर अशा जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता असून काही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
मध्य महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ही शक्यता जास्त असल्याची देखील माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.