अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- 2021 संपले आणि 2022 ला सुरुवात झाली. नवीन वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देत असताना जगभरात अनेकजण जोरदार सेलिब्रेशन करतात, पार्टी, पब, डिस्को, हॉटेल इथं जाऊन सेलिब्रेशन केलं जातं.(new year)

या पार्टीदरम्यान ड्रिंक्स देखील काहीजण घेतात. मात्र अतिरिक्त सेवनाने दुसऱ्या दिवशी याचा त्रास होतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा Hangover कसा दूर करावा, यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत…

लिंबूपाणी : एक ग्लास पाणी घ्या. त्यात साधारण एक ते दोन चमचा लिंबाचा रस टाका आणि गरज असल्यास थोडं मीठ आणि साखरही टाका. हे मिश्रण सकाळी उठल्याबरोबर प्या, जेणेकरून तुमचा Hangover लवकर दूर होईल.

गूळ : गुळात तीळ आणि आलं मिसळून त्याची पेस्ट तयार करा. सकाळी उठल्याबरोबर ही पेस्ट खाल्ल्यास Hangover मुळे दुखणारं डोकं शांत व्हायला मदत होईल.

हि फळं खा… : संत्री, नाशपती, पेरू, अननस अशी फळं सकाळी उठल्याबरोबर नाश्त्यासोबत खाल्ल्यास Hangover दूर व्हायला मदत होईल. या फळांचा रस पिणंही परिणामकारक ठरू शकतं.

आलं : आलं थोडंसं भाजून घ्या आणि त्यानंतर चहामध्ये टाकून हा चहा सकाळी उठल्यावर प्या. जेणेकरून तुमचं डोकं दुखणं त्याचसोबत Hangover दूर होण्यास मदत होईल.