file photo

अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात आज १४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४७ हजार ५२६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८० टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७५६ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४७ आणि अँटीजेन चाचणीत १८ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ०२, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०२, पारनेर ०४, पाथर्डी ०१, राहुरी ०२ आणि संगमनेर १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, अकोले ०३, कोपरगाव ०५, नेवासा ०८, राहता ०७, राहुरी ०५, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १८ जण बाधित आढळुन आले.

कर्जत ०१, कोपरगाव ०८, नेवासा ०३, पाथर्डी ०१, राहता ०१, राहुरी ०३ आणि शेवगाव ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, अकोले ०२, जामखेड ०२, कर्जत १९, कोपरगाव ०७, नगर ग्रा. ०७, नेवासा १२,

पारनेर १४, पाथर्डी ०४, राहाता ३०, राहुरी ११, संगमनेर १२, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०४, इतर जिल्हा ०५ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,४७,५२६

उपचार सुरू असलेले रूग्ण:७५६

पोर्टलवरील मृत्यू नोंद:७०५५

एकूण रूग्ण संख्या:३,५५,३३७

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या