file photo

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  एसटी कर्मचारी सुभाष तेलोरे आणि दिलीप काकडे यांच्याबाबत पन्नास लाखांचा प्रस्ताव शासनाकडे का दिला जात नाही. तुम्हाला कशाची भीती वाटते,

असा सवाल एसटी कामगारांच्यावतीने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारला मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.(Minister Balasaheb Thorat) 

तसेच त्यांनी भूमिका स्पष्ट करून कॅबिनेटमध्ये ठराव आणावा, अशीही मागणी अॅड. सदावर्ते यांनी केली. अॅड. सदावर्ते यांनी मंगळवारी आंदोलक कामगारांची भेट घेतली.

याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. सदावर्ते म्हणाले, शेवटच्या गावातील माणूस, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, शेतमजूर, शासनातील कर्मचारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, प्रकाश आंबेडकर जोडले गेले आहेत.

आमची कोणतीही युनियन नाही, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. ५० वर्षे शरद पवारांनी टाळ्या पिटाळून घेतल्या. आम्हाला आमच्या वेदनांमध्ये ठेवले त्यामुळे आम्ही एकत्र येऊन संघर्षाला उभे आहोत.

प्रवासी संघटनाही आमच्याबरोबर आहेत, ९५ टक्के लोक आमच्या सोबत आहेत, हा आमचा विजय आहे. थोरात तुम्हाला सांगतो, तुमचा पंगा आमच्यासोबत नाही, तर महाराष्ट्रातील ९५ टक्के माणसांसोबत हा पंगा आहे.

आमच्या कष्टकऱ्याला चाॅकलेट देऊन, त्याला बँकेचे संचालक करतो, असे सांगितले. अहो आता त्यांच्याकडे माणूस राहिलेला नाही. पण आमची विलिनीकरण ही एकच मागणी आहे.