अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- कोरोना त्यानंतर अतिवृष्टी अनेक संकटांवर मात करत बळीराजाने मोठ्या मेहनतीनं पिके घेतली आहे. यातच सातत्याने कांद्याच्या भावामध्ये होणाऱ्या चढउतार पणामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाले आहे.

मात्र तरीही जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्यांची विक्रमी आवक सुरूच आहे. यातच राहाता बाजार समितीमध्ये देखील नियमित कांदा गोण्यांची आवक होत असल्याची माहित मिळते आहे.

राहाता बाजार समितीत 2601 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला 3600 रुपये भाव मिळाला. यामध्ये आपण पहिले तर कांदा नंबर 1 प्रति क्विंटलला 3200 ते 3600 असा भाव मिळाला.

कांदा नंबर 2 ला 2350 ते 3150 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 1100 ते 2300 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 2400 ते 2700 व जोड कांदा 300 ते 1000 रुपये भाव मिळाला.

तर दुसरीकडे येथील बाजार समितीत डाळिंबाची 3861 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 96 ते 125 इतका भाव मिळाला.

डाळिंब नंबर 2 ला 71 ते 95 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 70 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 35 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.