file photo

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- डोळ्यांमध्ये खाजेची समस्या भलेही तुम्हाला सामान्य वाटत असेल, पण ती सामान्य नाही. डोळ्यांना खाजविणे ही योग्य नाही. या वातावरणात ही समस्या थोडी वाढते.

अशावेळेस काय करावे आणि काय नाही, जाणून घ्या . . . जर डोळ्यांमध्ये खाज येऊ लागली किंवा दृष्टी कमी होऊ लागली तर यास मामुली समस्या समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका.

तसंच कोणाच्या सांगण्यावरून कोणतेही ड्रॉप्स डोळ्यात टाकू नका. अशाप्रकारच्या छोट्या-छोट्या समस्यांकडे लक्ष न दिल्यास समस्या गंभीर होऊ शकते.

अशीच परिस्थिती अनेकदा वृद्धांच्या बाबतीत बघायला मिळते. ते डोळ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. यामुळे समस्या गंभीर होते. म्हणूनच जाणून घेऊ डोळ्यांशी संबंधित काही खास गोष्टी आणि डोळ्यांची देखभाल कशी करायची हेसुद्धा जाणून घ्या . . .

० ऍलर्जी : – कोणत्याही क्रतूत डोळ्यांची ऍलर्जी होऊ शकते, पण उन्हाळा आणि वसंत क्रतूत याची शक्‍यता अधिक असते.

० मोतीबिंदूची समस्या : – असं मानलं जातं की, मोतीबिंदूची समस्या अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये अधिक आढळते, पण आता असं नाही.

जीवनशैलीत होत असलेल्या बदलांमुळे मोतीबिंदूची समस्या तरुणांबरोबरच बालकांमध्ये ही बघायला मिळते. जेव्हा तरुणांना डोळ्यांशी संबंधित समस्या सतावते, तेव्हा त्यांनी त्वरित नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

० मोतीबिंदू झाल्यास काय करावे ? : – नजरेत धूसरपणा जाणवत असेल तर नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर मोतीबिंदू आहे आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला तर वेळीच शस्त्रक्रिया करा. अर्थात, ही इमरजन्सी सर्जरी नाही, पण उशीर करण्याने ही काहीच फायदा होणार नाही.

वेळेवर शस्त्रक्रिया करण्याची दृष्टी ची गुणवत्ता टिकून रहाते, यामुळे जीवन सुधारते. शस्त्रक्रियठी डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींच पालन करणे आवश्यक आहे.

० शस्त्रक्रियेची वेळ : – काही जणांचा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया उन्हाळ्यात करायला आवडत नाही. कारण त्यांना असं वाटतं की, उन्हाळ्यात संसर्ग होऊ शकतो, पण हा केवळ एक गैरसमज आहे.

आता विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की, शस्त्रक्रियेत कोणतंही बँडेज किंवा इंजेक्शनची गरज भासत नाही. म्हणून तुम्ही कोणत्याही क्रतूत शस्त्रक्रिया करू शकता.

ही शस्त्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आहे. असं असलं तरी सावधगिरी बाळगणे तेवढेच आवश्यक आहे. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर डोळ्यांना निरोगी ठेवणे सहजशक्य आहे.

कोणताही संसर्ग किंवा आजार झाल्यास डोळ्यांची विशेष काळजी घ्या, यामुळे डोळे सुरक्षित राहतील.

० सावधगिरी आवश्यक : –

» डोळे खाजत असतील तरीही ते चोळू नका.

» डोळे स्वच्छ आणि साध्या पाण्याने धुवा. जास्त थंड किंवा खूप गरम पण्याने डोळे अजिबात धुवू नयेत.

» खाज येत असल्यास डोळ्यांना बर्फाने किंवा थंड पाण्याच्या घडीने शेका. तरीही समस्या कमी न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

» बाहेर जाताना दर्जेदार गॉगल घाला. जर तुम्हाला चष्मा असेल तर तो घालणं मुळीच टाळू नका.

» भरपूर पाणी प्या. दिवसभरात कमीत कमी तीन लिटर पाणी अवश्य प्या.