अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 Wheat Crop :-भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातील शेतकरी बांधव वेगवेगळे शेतमाल उत्पादित करत असतात. आपला देश आपल्या सर्व नागरिकांची भुक भागवुन मोठ्या प्रमाणात शेतमालाची निर्यात करत असतो.

यावर्षी आपल्या देशातून (India) मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात (Export of wheat) करण्यात आली आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारत हा सर्वात जास्त गहू उत्पादित करणाऱ्या देशांच्या यादीत दुसर्‍या स्थानी (Large Producer Of Wheat) विराजमान आहे.

खरं पाहता आपला देश एकूण गहू निर्यात पैकी सुमारे 54 टक्के गव्हाची निर्यात एकट्या बांगलादेशला (Bangladesh) करत असतो. मात्र सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे त्यामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा विपरित परिणाम झाला आहे. याचा परिणाम म्हणून भारताला गव्हाच्या निर्यातीसाठी अनेक नवीन ग्राहक देखील भेटत आहेत.

भारतीय शेतकऱ्यांच्या मेहनत आता फळाला येणार असल्याचे सांगितलं जात आहे. कारण की आता इजिप्तसारख्या (Misr) देशात भारतीय गव्हाची निर्यात केली जाणार आहे.

यामुळे आता भारतीय गहू इजिप्तमधील (Egypt) लोकांची भूक भागवणार एवढं स्पष्ट झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार इजिप्तने भारतातून गहू आयात करण्यास मान्यता दिली आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल (Union Minister of Commerce and Industry Piyush Goyal) यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले की, युक्रेन आणि रशियाकडून गव्हाचा सर्वात मोठा आयातदार इजिप्तने भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता दिली आहे.

ज्या अंतर्गत इजिप्तला एकूण दहा लाख टन गहू भारत निर्यात करणार आहे. त्यासाठी भारत सरकारनेही तयारी देखील सुरू केली आहे.

खरं पाहता, रशिया आणि युक्रेनला गव्हाचे आगार म्हणुन ओळखले जाते, मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धजन्य परिस्थिती मुळे जगभरातील गव्हाच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे.

यामुळे भारतीय गव्हाला जागतिक स्तरावर एक वेगळी आणि नवी ओळख मिळाली आहे. या दोन्ही देशात सुरू असलेल्या युद्धामुळे इजिप्त हा भारतीय गव्हाचा नवा ग्राहक म्हणून उदयास आला आहे.

त्याअंतर्गत शुक्रवारी भारत सरकारकडून गहू निर्यात करण्यास मंजुरी मिळाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, भारत सरकार एकूण 1 दशलक्ष टन गहू इजिप्तला निर्यात करणार आहे,

त्यापैकी 2.4 लाख टन गहू या महिन्यात अर्थात एप्रिलमध्ये पाठवला जाणार आहे. किंबहुना, आतापर्यंत इजिप्त गव्हाच्या घरगुती गरजांसाठी रशिया आणि युक्रेनवर पूर्णपणे अवलंबून होता.

ज्या अंतर्गत इजिप्तने 2020 मध्ये रशियाकडून $1.8 अब्ज आणि युक्रेनमधून $610.8 दशलक्ष किमतीचा गहू आयात केला. यामुळे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक याला भारतासाठी एक गोल्डन चान्स म्हणून संबोधत आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, भारतीय शेतकरी आता इजिप्त समवेतच संपूर्ण जगाचे देखील पोट भरणार आहे.