अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Wheat Cultivation : भारतात सर्वत्र रब्बी हंगामात गव्हाची लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra) देखील अनेक शेतकरी रब्बी हंगामात गव्हाची लागवड (Wheat Cultivation) करत असतात.

असे असले तरी शेतकरी बांधवांना (Farmers) नेहमीच एक प्रश्न पडलेला असतो की कोणत्या गव्हाच्या वाणाची लागवड केली पाहिजे जेणेकरून शेतकरी बांधवांना चांगला उतारा मिळू शकेल.

त्यामुळे आज आपण गव्हाच्या एका विशिष्ट वाणाविषयी जाणून घेणार आहोत, या वाणाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या जातीचा गहू दिसायला चांगला असतो याशिवाय या जातीचा गहू खाण्याला स्वादिष्ट आणि आरोग्यास देखील उत्तम असतो कारण की या गव्हात मुबलक प्रमाणात औषधी गुणधर्म आढळत असतात.

याशिवाय गव्हाचे हे वाण शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरते कारण की या गव्हाच्या वाणातुन चांगले दर्जेदार उत्पादन मिळत असते. मित्रांनो आज आपण ज्या गव्हाच्या जातीविषयी जाणून घेणार आहोत त्या गव्हाला शरबती गहू (Sharbati Wheat) म्हणून ओळखले जाते.

“शरबती” हे गव्हाचे एक मुख्य वाण आहे. देशात उपलब्ध गव्हाच्या सर्वात उत्कृष्ट जातींपैकी एक जात म्हणून शरबती गहु ओळखला जातो. मध्य प्रदेश राज्याच्या सीहोर भागात या शरबती गव्हाचे पीक मुबलक प्रमाणात घेतले जाते.

असे असले तरी याची लागवड देशातील इतरही भागात होत असते महाराष्ट्रातील शेतकरी देखील या गव्हाची लागवड करत असतात. मात्र महाराष्ट्रात अजूनही अपेक्षित अशी पेरणी या गव्हाची बघायला मिळत नाही.

सीहोर व आजूबाजूच्या परिसरात काळी कसदार माती असलेल्या जमिनी आहेत तसेच या परिसरात गाळाची सुपीक जमीनी देखील बघायला मिळतात. या जमिनी शरबती गव्हाच्या उत्पादनासाठी योग्य असतात आणि हेच एक मुख्य कारण आहे की या भागात मोठ्या प्रमाणात शरबती गव्हाची लागवड केली जाते.

शरबती गव्हाला सोनेरी गहू असे देखील म्हणतात, कारण त्याचा रंग सोनेरी असतो. तसेच या जातीचा गहू तळहातावर जड वाटतो अर्थात या जातीचा गहू वजनदार असतो व त्याची चव गोड असते म्हणून त्याचे नाव शरबती पडले असावे असा दावा केला जातो.

सिहोर जिल्ह्यात “शरबती गहू” ची पेरणी 40390 हेक्टर क्षेत्रावर झाली असून वार्षिक उत्पादन 109053 दशलक्ष टन एवढे दर्जेदार आहे.

या जातीच्या गव्हाची पेरणी करायची असेल तर 30-35 किलो/एकर या प्रमाणात बियाणाची आवश्यकता असते. या गव्हाचे उत्पादन हेक्टरी 40-45 क्विंटल मिळत असल्याचा शेतकरी बांधव दावा करत असतात.

या जातीचा गहू 135 ते 140 दिवसात काढणीसाठी तयार होत असतो. या जातीच्या गव्हातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी कमीत कमी गव्हाला दोनदा पाणी देणे आवश्यक असते.