अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- घराच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करुन 1 लाख 83 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे घडली आहे.(Ahmednagar Crime)

याबाबत काकासाहेब भागुजी हारसुळे (वय 42) धंदा-शेती रा. सलाबतपूर ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती हंसी कि, मुलीच्या कुंकवाच्या दुसर्‍या दिवशी कार्यक्रम असल्याने रात्री बाहेर स्वयंपाक सुरू होता. त्यानंतर घराचा दरवाजा उघडा होता.

या दरवाजातून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने रोख तीन हजार रुपये रक्कम चोरून नेले. हारसुळे म्हणाले, मी बाहेर झोपलेलो होतो तसेच स्वयंपाकाचे काम आटोपून दोन स्वयंपाकी निघून गेले होते व दोघे घराबाहेर झोपलेले होते.

घरात भाची ओरडल्याने मी घरात गेलो असता तिथे पोटमाळ्यावर एक जण व खाली एक जण होते मला पाहताच ते पळून गेले. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल आहे.