अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- सोशल मीडियावर दररोज काहीना काही फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे सर्वांचीच मनं जिंकतात,

यावेळीही एका बाप-लेकीचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, जो एखाद्या स्टेडियमसारख्या जागेवर काढलेला दिसतो.

या ठिकाणी वडील आणि मुलगी पोलिसांच्या गणवेशात आहेत, ज्यामध्ये दोघेही एकमेकांना सॅल्यूट करत आहेत, हा फोटो लोकांना खूप आवडला आहे.

ITBP ने एक फोटो पोस्ट केला आहे :- इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर हे छायाचित्र पोस्ट केले आहे, ज्यामध्ये महिला पोलीस अधिकारी तिच्या डीआयजी वडिलांना सलाम करत आहे,

वडिलांनी तिचा सलाम स्वीकारला आणि प्रत्युत्तरात त्यांनाही सलाम केला, ITBP ने सोबत लिहिले आहे. एका अभिमानी पित्याचा एका अभिमानी मुलीला सलाम.

वडील देखील अधिकारी :- अपेक्षा निंबाडिया असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे, ती यूपी पोलिसात डेप्युटी एसपी आहे,

तिने नुकतेच डॉ. बी.आर. आंबेडकर अकादमी, यूपी पोलिस, मुरादाबाद येथून तिची पासिंग आऊट परेडचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये तिचे वडील एपीएस निंबाडिया आणि आई बिमलेश यांचाही सहभाग होता.

वडील देखील अधिकारी :- अपेक्षाचे वडील ITBP मध्ये DIG आहेत, ITBP ने इंस्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत,

ज्यात एका फोटोत अपेक्षा वडिलांना वंदन करत आहे, तर दुसर्‍यामध्ये ते दोघे बोलत आहेत, या फोटोला सोशल मीडिया यूजर्सनी खूप पसंती दिली आहे. दोन्ही चित्रांवर लोक भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.