मुंबई : भाजपा (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यामध्ये (Pune) पत्रकारांशी बोलताना खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या हनुमान चालिसा प्रकरणावर शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला आहे.

चंद्रकांतदादा म्हणाले, लीलावती रुग्णालय (Lilavati hospital) खासगी आहे. तिथे काय करायचे हा रुग्णालय प्रशासन ठरवेल, मात्र शिवसेनेला याचा विसर पडलाय की आपण एक परिपक्व पक्ष आहोत. आपण सत्तेत होतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घ्यावे, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

तसेच नवनीत राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) घरासमोर हनुमान चालिसा वाचायची होती. तेव्हा शिवसेनेने त्यांना त्यावेळी सांगायचे होते. नवनीत राणांच्या घराबाहेर निदर्शने करण्याची काय गरज होती? ते हनुमान चालिसा म्हणणार होतो, रावणचालिसा नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

त्याचसोबत छोडेंगे नही, पाव तोडेंगे असे म्हणत चंद्रकांतदादा यांनी या सर्वांवरून शिवसेना जुन्या मोडमध्ये गेली आहे. दादागिरी सुरू आहे, असा आरोप केला आहे.

दरम्यान, नवनीत राणा लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल असताना त्यांचा एमआरआय झाला आहे. त्या कक्षातले फोटो समोर आले असून यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.