Katrina Kaif and Vicky Kaushal wedding :- सुपरस्टार सलमान खान कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही.

तो कॅटरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न वगळू शकतो. असंही बोललं जात आहे की, पहिलं निमंत्रण सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना पाठवण्यात आलं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशलचा प्रत्येक चाहता या दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे.

बातम्यांनुसार, दोघेही 7 ते 9 डिसेंबर दरम्यान सात फेरे घेतील. या दोघांच्या लग्नाचे बुकिंग सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे झाले आहे.

तयारी चांगली होतेय की नाही हे पाहण्यासाठी दोघांच्याही घरचे जयपूरला पोहोचले आहेत. लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार असल्याचेही बोलले जात आहे.

कॅटरिनाच्या लग्नात सलमान सहभागी होणार नाही :- झी न्यूजच्या वृत्तानुसार, सुपरस्टार सलमान खान कुटुंबासह कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही.

तो कॅटरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न वगळू शकतो. असंही बोललं जात आहे की, पहिलं निमंत्रण सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना पाठवण्यात आलं होतं.

कतरिना कैफचे सलमान खानसोबत कौटुंबिक संबंध आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. चांगल्या आणि वाईट काळात सलमान नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहिला आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या यादीत अनेक लोकांचा समावेश होणार आहे. दोघेही इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रांना आणि मार्गदर्शकांना बोलावणार आहेत.

या यादीत करण जोहर, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, मिनी माथूर आणि रोहित शेट्टी यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय वरुण धवन आणि नताशा दलालही लग्नाला उपस्थित राहू शकतात.

कॅटरिना कैफचा साखपुड्याचा सोहळा दिग्दर्शक कबीर खानच्या मुंबईतील घरात पार पडला. कॅटरिना कबीर खानच्या खूप जवळ असून त्याच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. कबीर हा अभिनेत्रीचा राखी भाऊ आहे.

विकी आणि कॅटरिनाच्या कुटुंबातील सदस्यांनी साखरपुड्याच्या सोहळ्याला हजेरी लावली होती. साखरपुड्याचा सोहळा अतिशय सुंदर झाल्याचे या जोडप्याच्या जवळच्या मित्राने सांगितले. सजावट लाईट्सने केली होती आणि लेहेंग्यात कॅटरिना खूपच सुंदर दिसत होती.