Maharashtra News:सत्तासंर्घषानंतर निर्माण झालेल्या राजकीय आणि कायदेशीर पेचावर आज सुप्रिम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे एक ट्विट लक्षवेधक ठरले आहे.रोहित पवार यांनी म्हटले आहे, “सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.

बंडखोर आमदारांचं काय होईल, सरकार कोसळेल की वाचेल यात सामान्य जनतेला रस नसून लोकशाही मूल्ये जपली जातील का? अनियंत्रित सत्तेला वेसण घातली जाईल का? संविधान टिकेल का? हे खरे प्रश्न असून त्याकडं सामान्य माणसाचं लक्ष आहे.

“सध्याचे सरकार टिकणार की कोसळणाऱ? शिवसेना नेमकी कोणाची असल्याचा निर्णय कोर्ट देणार या प्रमुख मुद्द्यांकडे लक्ष लागले आहे. असले तरी यापेक्षा लोकाशाहीच्या मूल्यांची ही परीक्षा असल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.