Chandrasekhar Bawankule : राज्यत विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आणि युती तुटली. मुख्यमंत्री पदाच्या रस्सीखेचामुळे शिवसेना आणि भाजप एकेमकांपासून दूर झाले. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केल्याची टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

शिवसेनेने भाजप पासून वागेल होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र शिवसेनेतील काही आमदारांनी बंड करत भाजपसोबत पुन्हा एकदा राज्यात सरकार स्थापन केले आहे.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादीचा राज्यात बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न होता. तो त्यांनी यशस्वी केला.

म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर एकप्रकारे जादूटोणा करण्याचा हा प्रकार होता. तो त्यांनी केला. त्या जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत गेले. राष्ट्रवादीने हा जादूटोणा केला होता.

म्हणून उद्धव ठाकरे यांचं मन डायव्हर्ट झालं आणि दरवाजे बंद करून ते तिकडे गेले, असं सांगतानाच शरद पवार हेच या जादूटोण्याचे भोंदूबाबा आहेत, अशी खरमरीत टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. दूबाबा कोण आहे हे देशाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे. परत परत सांगायची गरज नाही. एकदा शरद पवारांच्या ताब्यात कोणी आला तर तो सुटत नाही असेही ते म्हणाले आहेत.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात त्यांनी ईडी, सीबीआयचा वापर का केला नाही? असा प्रश्नही विचारला आहे. महाविकास आघाडीचे नेते सत्ता गेल्याने अस्वस्थ झाले आहेत.

सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे करणाऱ्यांना भिती आहे म्हणून आरोप होत आहेत. त्यांच्या काळात ईडी, सीबीआय होती. त्यावेळी त्यांनी त्यांचा वापर का केला नाही?