file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- लहान मुलांची एकमेकांशी वाद झाले होते. त्यावरून माझ्या मुलाला का मारले, असा जाब विचारणाऱ्या एका विधवा महिलेला काठीच्या दांड्याने जबर मारहाण करण्यात आली.

हा प्रकार पाथर्डी तालुक्यात घडला. दरम्यान या महिलेला मारहाण करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस मारहाण करणाऱ्या नाथा खाताळ याचा शोध घेत आले.

मात्र तोपर्यंत तो पसार झाला. सहा वर्षांपूर्वी ऊसतोडणीचे काम करताना या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पीडित महिला व तिचे मुले येथे राहतात.

त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नाथा खताळ याच्या लहान मुलांवरून वाद झाले होते. यावरून नाथानेही त्या मुलाला मारहाण केली होती. तुम्ही माझ्या मुलाला का मारहाण केली, असा जाब या महिलेने त्याला विचारला असता,

खताळ याने व त्याच्या पत्नीने तीला मारहाण केली. काही लोक महिलेच्या मदतीला धावले. याबाबत पोलिसंाना माहिती समजताच पोलिस घटनास्थळी आले मात्र तोर्यत खताळ घराला कुलूप लावून पळून गेला होता.