अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- शेतीच्या बांधावर इलेक्ट्रीक पोल उभारण्याच्या कारणावरून महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित महिलेच्या फिर्यादीत म्हंटले आहे कि,

महिला व तिचे नातेवाईक शेतीच्या सामाईक बांधावर चालू असलेले इलेक्ट्रीक खांब रोवण्याचे काम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले व फिर्यादीस म्हणाले,

तुम्ही बांधावर खांब का रोवता? असे म्हणाले असता फिर्यादी हे आरोपीमध्ये बाचाबाची झाली. यामुळे आरोपीला राग आल्याने त्याने फिर्यादी महिलेस शिवीगाळ करून फिर्यादीचे पती यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीची जाव त्यांचे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादीचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी कोंडिराम मंजाबापू गुलदगड रा. तनपुरेवाडी रोड, राहुरी याच्या विरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.