अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- अंत्‍योदय चळवळीच्‍या विचारातून भारताला समृध्‍द आणि बलशाली बनविण्‍याचे प्रयत्‍न पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे सुरु आहेत. समाज सक्षम करण्‍याचे त्‍यांचे प्रयत्‍न आहेत.

बुथ रचनेच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येक कार्यकर्त्‍यांने गावपातळीवर राजकीय इच्‍छाशक्‍ती जागृत ठेवून काम करावे असे आवाहन समर्थ बुथ अभियाचे राज्‍याचे समन्‍वयक आ.डॉ.रामदास आंबटकर यांनी केले. जनसंघाचे संस्‍थापक डॉ.श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधून शिर्डी विधानसभा मतदार संघात सर्व बुथप्रमुख आणि शक्‍तीप्रमुखांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.

या कार्यशाळेत आ.डॉ.आंबटकर यांनी मार्गदर्शन केले. आ.राधाकृष्‍ण विखे पाटील, माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, उत्‍तर महाराष्‍ट्र समन्‍वयक प्रा.भानुदास बेरड, शिर्डीचे नगराध्‍यक्ष शिवाजीराव गोंदकर, जिल्‍हा संघटन सरचिटनीस नितीन दिनकर,

उपाध्‍यक्ष नितीन कापसे, तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, शिर्डी शहर अध्‍यक्ष सचिन शिंदे, युवा मोर्चाचे तालुका अध्‍यक्ष सतिष बावके, अशोकराव पवार, लोकसभा समन्‍वयक यो‍गिराजसिंह परदेशी, डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे व्‍हा.चेअरमन विश्‍वासराव कडू, सभापती सौ.नंदा तांबे, ओमेश जपे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

डॉ.आंबटकर यांनी बुथप्रमुख आणि शक्‍ती प्रमुख यांना आपल्‍या जबाबदारीची माहीती करुन देतानाच राज्‍यात ७६ हजार बुथ समित्‍यांची नोंदणी झाली असून, १६ हजार शक्‍ती केंद्राची रचना पुर्ण झाली आहे. भाजपाच्‍या राज्‍यभरातील कार्यकर्त्‍यांनी केलेल्‍या कामामुळेच हे एवढे मोठे संघटनात्‍मक काम पूर्ण होवू शकले आहे.

याकडे लक्ष वेधून आ.आंबटकर म्‍हणाले की, डॉ.श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांनी पेरलेले एकात्‍म मानव वादाचे बिज हे आता देशभर उमटू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी वसुधैव कुटुम्‍बकम् या विचाराने वाटचाल सुरु केली आहे. यामध्‍ये प्रत्‍येक सामान्‍य माणसाचा विचार पाहायला मिळतो.

केंद्र सरकारच्‍या योजनांमध्‍ये अंत्‍योदय चळवळीचा विचारच असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन सांगितले. बुथ प्रमुखांनी गावपातळीवर संघटनेची बांधणी करतानाच राजकीय इच्‍छाशक्‍तीने काम करण्‍याचे आवाहन करुन, डॉ.आंबटकर म्‍हणाले की, केंद्र सरकारच्‍या योजना या सामान्‍यापर्यंत पोहोचवितानाच समाजातील प्रत्‍येक घटक पक्षाशी कसा जोडला जाईल असे काम करण्‍याचे त्‍यांनी सुचित केले.

आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणात गावपातळीर काम करणारा बुथप्रमुख आणि शक्‍तीप्रमुख हा ख-याअर्थाने पक्षाचे डोळे आणि कान आहेत. लोकांच्‍या संपर्कात राहणारा आणि पक्षाची भूमिका समाजापर्यंत पोहोचविण्‍याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्‍यासाठी ही बुथरचना आहे.

जगाच्‍या पाठीवर समाजाप्रती संवेदनशिलता दाखविणारे नेतृत्‍व म्‍हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे नाव आता जगाच्‍या पाठीवर घेतले जात आहे. एवढ्या मोठ्या पक्षाचे काम करताना अभिमानाने प्रत्‍येक बुथवर केंद्र सरकारच्‍या योजनांचा आढावा आपण घ्‍यावा असे आवाहन त्‍यांनी केले.

याप्रसंगी माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोदकर,उत्‍तर महाराष्‍ट्राचे बुथ अभियानाचे समन्‍वयक प्रा.भानुदास बेरड, नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.