World’s Most Expensive Medicine  : तुम्हाला जगातील सर्वात महाग औषधचे नाव माहित आहे का नाही ना आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महाग औषधचे नाव सांगणार आहोत आणि याचा एक डोससाठी किती खर्च येतो हे देखील तुम्हाला सांगणार आहोत.

काही दिवसापूर्वीच यूएस मध्ये अन्न आणि औषध प्रशासन (USFDA) ने हेमजेनिक्स नावाच्या औषधाला मान्यता दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हे औषध जगात आता पर्यंत सर्वात महाग आहे. ज्याची किंमत प्रति डोस $3.5 दशलक्ष आहे, म्हणजेच भारतीय रुपयानुसार, त्याची किंमत सुमारे 28 कोटी रुपये आहे.

हे औषध बनवणारी कंपनी सीएसएल बेहरिंग म्हणते की हे जबरदस्त औषध आरोग्य सेवेचा खर्च कमी करण्यासाठी येईल. ग्लोबल न्यूजच्या रिपोर्टनुसार, हीमोफिलिया बी साठी देशातील ही पहिली जीन थेरपी आहे. हे औषध रक्त गोठण्याच्या एक वेळच्या उपचारांसाठी वापरले जाते. आता हे सर्वात महाग औषध एजन्सीने बाजारात विक्रीसाठी ठेवले आहे.

हिमोफिलिया रोग म्हणजे काय?

हिमोफिलिया हा रक्तस्त्राव विकार आहे. हा एक अनुवांशिक आजार असून तो फार कमी लोकांमध्ये आढळतो. या आजारामुळे शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे शरीरातून वाहणारे रक्त लवकर थांबत नाही.

अशा परिस्थितीत वेळीच उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यूही होऊ शकतो. यासाठी रुग्णाला फॅक्टर IX चे अनेक महागडे IV ड्रीप्स घ्यावे लागतात. हे एक प्रोटीन आहे, ज्याद्वारे रक्ताच्या गुठळ्या गोठतात. हा आजार महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त दिसून येतो.

भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक 5,000 पुरुषांपैकी एकाला हिमोफिलियाचा त्रास होतो. म्हणजेच आपल्या देशात दरवर्षी सुमारे 1300 मुले हिमोफिलियाने जन्माला येतात. हिमोफिलिया बी हा विकार अतिशय गंभीर आजार आहे. याचा अंदाजे 40,000 लोकांपैकी एकावर परिणाम होतो. हेमजेनिक्स हे यकृतामध्ये गुठळ्या निर्माण करणार्‍या प्रथिनासाठी जनुक देऊन कार्य करते, त्यानंतर रुग्ण स्वतः ते तयार करू शकतो.

हे पण वाचा :-   Old Phones : जुना फोन फेकून देत असाल तर थांबा ! ‘या’ पद्धतीने करा वापर ; होणार बंपर फायदा