Money News: यशाला गवसनी घालण्यासाठी व्यक्तीला त्या क्षेत्रातील आवड असणे अतिशय महत्वाचे असते. जर व्यक्तीने त्याच्या आवडत्या क्षेत्रात करिअर घडवण्याचे ठरवले तर निश्चितचं तो त्या क्षेत्राचा बिग बॉस ठरू शकतो. मग ते क्षेत्र कुठलेही असो, अगदी शेतीचे (Farming) का असेना तो त्या क्षेत्रात मोठी उत्तुंग भरारी घेऊ शकतो.

असं काहीच साजस आणि उत्तम उदाहरण समोर आल आहे ते कोकणातील रत्नागिरी (Ratnagiri) या जिल्ह्यातून. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील (Rajapur) मौजे जानसी येथील प्रशांत नामदेव पटवर्धन नामक एका उच्च शिक्षित नवयुवकाने आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा शेतीला अधिक महत्त्व दिले आणि विशेष म्हणजे काळ्या आईची सेवा करण्याचा त्याचा निर्णय आजच्या मितीला त्याच्यासाठी जणूकाही वरदानच सिद्ध झाल आहे.

प्रशांत यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण केंद्रीय अभ्यासक्रमांमध्ये केले. पदवी झाल्यानंतर प्रशांत यांच्या अनेक मित्रांनी नोकरी निमित्ताने विदेशाची वारी केली. प्रशांत यांना देखील विदेशात सहा-सात आकडी पगारची नोकरी मिळाली असती मात्र, त्याकडे प्रशांत यांचे काही मन रमेना मग त्यांनी पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर पूर्णवेळ शेती करण्यास सुरुवात केली. गेली 22 वर्ष प्रशांत यांनी शेती व्यवसायात रोजाना काळाच्या ओघात वेगवेगळे नावीन्यपूर्ण बदल करत यशाची गिरी शिखरे सर केली आहेत.

प्रशांत यांचे वर्गमित्र परदेशात जाऊन चांगला बक्कळ पैसा कमवत आहेत. मात्र प्रशांत आपल्या आजीच्या सल्ल्याने आपली वडिलोपार्जित शेती कसू लागले. सुरुवातीला त्यांच्या शेतीत काही पिकांची लागवड होती.

मात्र शेती प्रशांत यांच्या हातात आल्यानंतर त्यांनी वेगवेगळे बदल करीत आंबा, काजू, नारळ, सुपारी या पिकांची शेती सुरू केली. एवढेच नाही तर काही पिकांमध्ये आंतरपीक घेण्यास देखील सुरुवात केली. यामध्ये नारळ व सुपारी बागेत लवंग, जायफळ, काळीमिरी इत्याफ आंतरपिकाची लागवड प्रमुख आहे.

प्रशांत यांनी आपल्या साडेपाच एकर क्षेत्रात कोकणची शान असलेला हापूस तसेच इतर जातींच्या आंब्याची लागवड केली आहे. यासाठी प्रशांत यांना कृषी विद्यापीठाचा देखील मोलाचा सल्ला लाभला आहे. प्रशांत यांनी आपल्या आंबा बागेत केवळ हापूस या जातीच्या आंब्याची लागवड न करता मिश्र आंब्याच्या जातींची लागवड केली आहे.

यामुळे आंब्याला उत्तम फळधारणा होत असल्याचा प्रशांत यांचा दावा आहे. प्रशांत यांनी आपल्या आंबा बागेत पायरी, आम्रपाली, रायवळ, केशर, एनी टाईम (एटीएम) या आंब्याच्या प्रगत जातींची लागवड केली आहे.

हापूसच्या 10 झाडांमागे एक इतर जातीचा आंबा लागवड केली आहे. यापैकी एटीएम हा आंबा चवीला उत्कृष्ट असून वर्षातून दोन वेळेस उत्पादन देण्यास सक्षम आहे. यामुळे प्रशांत त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.

प्रशांत यांनी मिश्र पीक पद्धतीला अधिक प्राधान्य दिले असून आपल्या नारळ व सुपारी बागेत वेगवेगळ्या मसाला वर्गीय पिकांची आंतरपीक म्हणून लागवड केली आहे. प्रशांत त्यांचा हा प्रयोग त्यांच्यासाठी अतिरिक्त उत्पन्न करून देण्याची एक हमीचे साधन बनले आहे.

प्रशांत यांनी नारळ बागेत मसाला, केळी, अननस यांसारख्या पिकांची शेती सुरू केली आहे. याशिवाय सुपारी बागेत मसाला पिकांची शेती सुरू केली आहे. दरवर्षी प्रशांत काळी मिरीच्या शेतीतून 200 किलो उत्पादन मिळवत आहेत. एकंदरीत मिश्र पीक पद्धतीतून प्रशांत दरवर्षी लाखो रुपयांचा नफा कमवीत आहेत.

याशिवाय प्रशांत यांनी भाजीपाला वर्गीय पिकांची देखील शेती सुरू केली आहे. आपल्या 10 गुंठे क्षेत्रात कोबी, पालक, मुळा, गाजर, फ्लॉवर, कलिंगड, पावसाळ्यात चिबूड, काकडी, दोडके, पडवळ, लाल भोपळा, दुधी भोपळा यांसारख्या भाजीपाला वर्गीय पिकांची शेती करून ते चांगला बक्कळ पैसा कमवत आहेत. याव्यतिरिक्त प्रशांत यांनी आपल्या मळ्यात दीडशे काजूची झाडे देखील लावली आहेत. प्रशांत आपला आंबा मुंबई पुणे यांसारख्या मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवत आहेत.

निश्चितच प्रशांत यांनी उच्चशिक्षित असूनही शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे प्रशांत यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आणि आजच्या घडीला मायदेशी राहूनच प्रशांत चांगले बक्कळ उत्पन्न कमवीत आहेत.