लखनऊ : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सरकारने मदरशांमध्ये राष्ट्रगीत (National anthem) अनिवार्य करण्याबाबत निर्णय घेतला असून सर्व जिल्हा कल्याण अधिकाऱ्यांना (District Welfare Officer) सूचना देण्यात आल्या आहेत.

योगी सरकारचा हा निर्णय योगी आदित्यनाथ सरकारचा रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मदरशांना ३० मार्च २०२२ ते ११ मे २०२२ या कालावधीत सुट्टी असते. मात्र आता मदरशांमधील (madrassas) शिक्षण पुन्हा सुरू होणार आहे.

या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच जारी केलेले निर्देश सर्व मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्ये लागू असेल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील मदरशांना रमजानची सुट्टी होती. आता या सुट्ट्या संपल्या असून, पुन्हा मदरशांमधील शिक्षण सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मदरसा शिक्षण परिषदेने ०९ मे रोजी प्रदेशातील सर्व अल्पसंख्यक कल्याण अधिकाऱ्यांना एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये २४ मार्च २०२२ रोजी झालेल्या परिषदेच्या बैठकीत मान्यता प्राप्त/अनुदानित/गैर अनुदानित मदरशांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रापासून मदरशांमधील प्रार्थनेबरोबर सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य असेल, असे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच या आदेशाचे पालन व्हावे यासाठी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांनी नियमितपणे देखरेख ठेवावी लागणार असून आता सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात येत आहे, असे अल्पसंख्यक कल्याण मंत्री दानिश आझाद अन्सारी (Danish Azad Ansari) यांनी सांगितले आहे.