अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- नैसर्गिक चमत्कार असलेला शून्य सावली दिवस ३ ते ३१ मे रोजी महाराष्टात विविध ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. अहमदनगर शहरात १६ मे रोजी सावली गायब होणार आहे.

या दिवशी तेथे सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. एका अक्षांशावर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशीं शून्य सावली दिवस येतात.

राज्यातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत, त्यामुळे सर्व शp[हरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. दुपारी १२.०० ते १२.३५ या वेळेत हा अनुभव घेता येतो.

असे आहेत राज्यातील शून्य सावली दिवस

३ मे सावंतवाडी, शिरोडा मांगेली,खूषगेवाडी
४ मे मालवण,आंबोली
५ मे देवगड,राधानगरी, रायचूर
६ मे कोल्हापूर, इचलकरंजी,
७ मे रत्नागिरी, सांगली, मिरज
८ मे कऱ्हाड, जयगड, अफजलपूर
९ मे चिपळूण, अक्कलकोट
१० मे सातारा, पंढरपूर, सोलापूर
११ मे महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाई
१२ मे बारामती, बार्शी, उस्मानाबाद
१३ मे पुणे,मुळशी, दौड, लातूर,लवासा,असरल्ली
१४ मे लोणावळा, अलिबाग, दाभाडे,पिंप्री-चिंचवड, देहू,जामखेड, आंबेजोगाई,
१५ मे मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड,माथेरान, राळेगण सिद्दी, सिरोंचा
१६ मे बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर,नारायण गाव,खोडद,अहमदनगर, परभणी, नांदेड, निर्मल
१७ मे नाला सोपारा, विरार,आसनगाव, अहेरी,आल्लापल्ली,
१८ मे पालघर,कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा
१९ मे औरंगाबाद,डहाणू,नाशिक,कोपरगाव,वैजापूर, जालना, पुसद,बल्लारशा,चामोर्शी
२० मे चंद्रपुर,मेहकर,वाशीम,वणी,मूल
२१ मे मनमाड,चिखली, गडचिरोली,सिंदेवाही, रोहना,
२२ मे मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी
२३ मे खामगाव, अकोला , देसाईगंज, ब्रम्हपुरी,नागभीड
२४ मे धुळे,जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड,दर्यापूर
२५ मे जळगाव,भुसावळ, अमरावती,अंमळनेर,तेल्हारा
२६ मे नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा
२७ मे नंदुरबार, शिरपुर, बुऱ्हाणपूर, परतवाडा, चिखलदरा, तुमसर,गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक
२८ मे अक्कलकुआ,शहादा, पांढुरणा, वरुड,नरखेड,
२९ मे बोराड, नर्मदा नगर,
३० मे धाडगाव
३१ मे तोरणमाळ