संगमनेरमध्ये एका दिवसात ३० रुग्ण तर एकाचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

काल दिवसभरात संगमनेर तालुक्यात 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर नाशिक येथे उपचार घेत असलेल्या एकाच मृत्यू झाला. अद्यापपर्यंत तालुक्यात 456 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 279 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

उपचार सुरू असलेल्यांची संख्या 160 आहे तर एकूण मृत्यू 17 आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच २ हजार 850 स्वॅब घेण्यात आले आहेत.

या ठिकाणी रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणीची अंमलबजावणी होत असल्याने संक्रमितांची संख्या झपाट्याने पुढे येत आहे. काल जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार संगमनेरातील नगररोड 50 वर्षीय पुरुष,

मालदाड रोेड 30 वर्षीय पुरुष, घुलेवाडी 16 वर्षीय तरुण, रायते 54 वर्षीय पुरुष, निमगावजाळी येथील 65 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथील 38 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 45 वर्षीय महिला,

23 वर्षीय तरुणी, 20 वर्षीय तरुणी, 44 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय मुलगा, 38 वर्षीय पुरुष, पिंपळगाव देपा येथील 22 वर्षीय तरुणी, 3 वर्षीय मुलगी, 1 वर्षीय मुलगा, शिबलापूर येथील 42 वर्षीय महिला,

50 वर्षीय पुरुष, संगमनेरातील घासबाजार येथील 57 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुणी, 55 वर्षीय पुरुष, बाजारपेठेतील 65 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला याप्रमाणे 24 कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहे.

तर खाजगी लॅबमधून प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये मंगळापूर येथील 71 वर्षीय पुरुष, कुरण येथील 37 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील 40 वर्षीय महिला, संगमनेरातील भारतनगर येथील 54 वर्षीय महिला,

पेमगिरी येथील 30 वर्षीय पुरुष, राजापूर येथील 60 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमणाची साखळी वाढतच चाललेली असल्याचे चित्र आहे.

एकूण रुग्णसंख्येने जिल्ह्यात २ हजारांचा टप्पा पार केला आहे. नागरिकांनी सलग राहून , सुरक्षेचे नियम पाळावे तसेच शक्य असल्यास घरातच थांबावे, गरजेचे असल्यासच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment