अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजपाला धक्का बसला आहे.
परंतु त्यांच्या पक्षांतरानंतर एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार असल्याने त्यांना राष्ट्रवादीने फोडले, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केला होता.
याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले , ‘ प्रा. शिंदे यांना भाजपात मीच प्रवेश दिला असून ‘ओ अभि बच्चा है’ . राम शिंदे हे प्राध्यापक आहेत. त्यांना भाजपात मी घेतले होते.
त्यांच्या आमदाराकीच्या तिकीटासाठी मी प्रयत्न केले. त्यासाठी शिफारसही मी केली असल्याचे खडसे यांनी सांगितले. दरम्यान,
काँग्रेसमध्ये येण्यासाठी भाजपचे अनेक जण इच्छुक आहेत असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्रात आम्ही सर्व मिळून भाजपचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
भाजपमधील लोकांचा पक्षात येण्याबाबत योग्यवेळी निर्णय घेतले जातील असेही ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved