‘हमीभाव नाकारणारा शेतकरी विरोधी अध्यादेश मागे घ्या’ !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-कंत्राटी शेतीला प्रोत्साहन देणारा तसेच शेतमालाला हमीभाव नाकरणारा शेतकरी विरोधी अध्यादेश केंद्र सरकारने मागे घ्यावा या मागणीसह जनविरोधी धोरणांविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेवगाव तहसिल कार्यालयासमोर मागण्यांचे फलक दाखवत सोमवारी निदर्शने करण्यात आली.

यावेळी भाकपचे ज्येष्ठ नेते शशिकांत कुलकर्णी, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशिनकर, भगवान गायकवाड, आत्माराव देवढे, कारभारी वीर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

सोमवारपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होत असल्याचे औचित्य साधून मोदी सरकारच्या शेतकरी व जनविरोधी धोरणांविरोधात हे निदर्शने करण्यात आले.

कुलकर्णी म्हणाले, शेतीमाल, सिंचन व्यवस्था, औषधे, बि- बियाणे, नैसर्गिक आपत्ती आदींबाबत केंद्र सरकारने शेतकरी विरोधी धोरणे राबवली आहेत.

कोरोना काळाचा फायदा घेऊन बाजार समित्यांचे अधिकार कार्पोरेट कंपन्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूच्या

यादीतून काही शेती माल वगळलेल्याचे सांगुन हमीभाव नाकारण्याचे षंडयंत्र या सरकारने अध्यादेश काढून करण्यात येत असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment