अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले फक्त इतकेच रुग्ण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात आज ११५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ९७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०४ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९९९ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३२ आणि अँटीजेन चाचणीत ३४ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०४, कर्जत ०४, पारनेर ०१, पाथर्डी ०५, राहाता ०१, संगमनेर ०२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, अकोले ०२, कर्जत ०१, कोपरगाव ०३, पारनेर ०१, राहाता १३, राहुरी ०१, संगमनेर ०३, शेवगाव ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०२, जामखेड ०२, कर्जत ०६, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण ०२, पाथर्डी ०१, राहता ०१, राहुरी ०१, संगमनेर १०, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २२, अकोले ०३, जामखेड ०२, कर्जत ०५, कोपरगाव ११, नगर ग्रामीण ०६, नेवासा ११, पारनेर ०५, पाथर्डी ०८, राहाता ०६, राहुरी ०४, संगमनेर १९, शेवगाव ०२, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२, जिल्हा बाहेरील ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:६६९७०
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: ९९९
  • मृत्यू:१०४५
  • एकूण रूग्ण संख्या:६९०१४

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

  • घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
  • प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
  • स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
  • अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
  • खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका
  • माझेकुटुंब_माझीजबाबदारी
  • अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserve
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment