अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- अखेर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका तहसीलदारपदी प्रदीपकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील एक ते दीड महिन्यापूर्वी तहसीलदार महिंद्र माळी यांची बदली झाली असून,
श्रीगोंदा तहसीलदारपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत सुरू असलेल्या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे. तत्कालीन तहसीलदार महिंद्र माळी यांची बदली झाल्यानंतर
जवळपास दीड महिना प्रभारी तहसीलदार सौ चारुशिला पवार यांनी येथील कार्यभार सांभाळला. आज अखेर नगर येथे अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून कार्यरत असणारे
प्रदीपकुमार रावसाहेब पवार यांची श्रीगोंदा तहसीलदार म्हणून निवड करण्यात आली आहे प्रदीपकुमार पवार हे मूळचे शिरूर तालुक्यातील असून श्रीगोंद्याला तरुण तहसीलदार लाभल्यामुळे सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत.
μतत्कालीन तहसीलदार महेंद्र माळी यांच्या काळात वाळू तस्करांनी धुडगूस घातला होता. आता याच वाळू तस्करांना रोखण्याचे मोठे आव्हान पवार यांच्यासमोर असणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved