कोची : भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तथा महिलांच्या अधिकारासाठी झटणाऱ्या समाजसेविका तृप्ती देसाई या भगवान अयप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी शबरीमला येथे पोहोचल्या.
यावेळी देसाई यांच्या सोबत चालूवर्षी जानेवारी महिन्यात अयप्पा मंदिरात जाऊन दर्शन घेतलेल्या सामाजिक कार्यकत्र्या बिंदू अम्मिनी यांच्यासह काही महिला कार्यकत्र्याही होत्या.
यावेळी एका माथेफिरूने बिंदू यांच्या चेहऱ्यावर मिरची-स्प्रे फवारल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर बिंदू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
पुणे येथील सामाजिक कार्यकत्र्या तृप्ती देसाई या भगवान अयप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी कोच्ची येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्या.
यावेळी त्यांच्यासोबत चालूवर्षी जानेवारी महिन्यात अयप्पा मंदिरात जाऊन दर्शन घेतलेल्या सामाजिक कार्यकत्र्या बिंदू अम्मिनी यांच्यासह काही महिला कार्यकत्र्याही होत्या.
सकाळी पोलीस कमिशनर कार्यालयातून बाहेर पडत असताना एका व्यक्तीने बिंदू या महिलेच्या चेहऱ्यावर मिरची स्प्रे फवारला. यानंतर सदर महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी श्रीनाथ पद्मनाभन नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विरोध करण्यासाठी येथे अयप्पा भक्तांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर गोळा झालेली होती.
१६ नोव्हेंबर रोजी मंदिराचा दरवाजा मंडलपूजा उत्सवासाठी उघडण्यात आलेला आहे. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा आदेश दिलेला होता.
तथापि या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सात न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.