पत्नीवर ऍसिड हल्ला करणाऱ्या पतीला १० वर्ष सक्तमजुरी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- पत्नीवर ऍसिड हल्ला केल्याबद्दल जिल्हा सत्र न्यायालयाने श्रीकांत आनंदा मोरे (रा. भिंगार) याला १० वर्षे सक्‍तमजुरी व ५० हजार रुपये दंड केला.

नगर शहरातील आलमगीर येथे २०१७ मध्ये ही घटना घडली होती. याबाबत अधिक माहिती अशी कि, यातील फिर्यादी महिलेचे २००८ मध्ये आरोपी मोरे लग्न झाले होते.

त्यांना दोन मुले आहेत, मात्र दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याने या त्रासाला कंटाळून ती महिला पतीला सोडून आपल्या आईच्या घरी राहायला गेली.

मुलेही तिच्या सोबत राहत होती. तेथील जिल्हा परिषद शाळेत मुले शिकत होती. ३ ऑगस्ट २०१७ रोजी एका शिक्षकासोबत मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघाली होती.

त्यावेळी रस्त्यावरच आरोपी मोरे आडवा झाला. त्याने दुचाकी थांबवून शिक्षकाला निघून जाण्यास सांगितले. त्यांनतर पत्नीसोबत काही अंतर बोलत पायी निघाला.

थोडे अंतर जाताच खिशातून ऍसिडची बाटली काढली व तिच्या अंगावर फेकले. ऍसिडमुळे ती होरपळून निघाली. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

तेथे पोलिसांनी तिचा जबाब घेतला. तिने सर्व हकीकत सांगून पतीविरुद्ध तक्रार केली. उपचार केल्यानंतर जीव वाचला मात्र जखमा कायम राहिल्या.

पोलीस निरीक्षक एस.पी, कवडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील मनीषा शिंदे यांनी बाजू मांडली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe