धक्कादायक ! महाराष्ट्रातील दहा धरणे बनली धोकादायक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- संयुक्त राष्ट्राच्या एका संस्थेने दिलेल्या अहवालानुसार देशातील धोरणांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

देशभरातील अनेक धरणांची परिस्थिती धोकादायक असून त्यात महाराष्ट्रातील दहा धरणांचा समावेश असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा, घाटघर तसेच मराठवाड्यातील जायकवाडी धरणांचा समावेश आहे. या इशार्‍याची दखल घेत सरकारने या धरणांचे ऑडिट करण्याची मागणी होत आहे.

देशात अशी 1200 धरणे धोकादायक स्थितीत आहेत. त्यातून पुढील काळात मोठा अनर्थ घडू शकतो असे या संस्थेने सर्वेत नमूद केले आहे. वय जास्त झाल्यास धरणे धोकादायक होतात.

जसं वय वाढेल तसा धोका आणखी वाढत जातो. भंडारदरा धरण 1926 मध्ये बांधले गेले आहे. याच धरणातील पाण्यावर उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, कारखानदारी बहरली आहे. हे धरण आशिया खंडातील सर्वात जुने आहे. तसेच जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe