अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील शिक्षक नेते, ऐक्य मंडळाचे माजी तालुकाध्यक्ष वाय. डी. पवार (४५, भांडगाव) यांचे सोमवारी नगर-कल्याण मार्गावर भाळवणी येथील एस. के. चौकात झालेल्या अपघातात निधन झाले.
रामकृष्ण पाटीलबा रोहोकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पवार यांची सध्या आळकुटी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नियुक्ती होती.
सोमवारी सकाळी ते शेतीच्या कामासाठी भांडगाव येथे गेले होते. काम आटोपून ते भाळवणीमार्गे पारनेरला येण्यासाठी निघाले होते.
मात्र, पारनेर रस्त्यावर एक-दोन ठिकाणी ओढ्यांना पूर आल्याने रस्ता बंद असल्याचे समजल्यावर त्यांनी वडगाव अमली येथे सासूरवाडीत मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
भाळवणी येथून वडगाव आमलीकडे जात असताना नगरकडे जाणाऱ्या कारची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. पवार यांचा जागेवरच मृत्यू झाला.
सोमवारी रात्री उशिरा त्यांच्यावर भांडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार सुरूवातीच्या काळात ऐक्य मंडळाचे अध्यक्ष होते. सध्या ते प्राथमिक शिक्षक संघात, बापूसाहेब तांबे गटात सक्रीय होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved