‘उद्धव ठाकरेंमुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटते’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. कंगनाने या सर्व प्रकारात उडी घेत कायम वादग्रस्त वक्तव्य केल्याने हे प्रकरण जास्त चर्चेत राहिलं.

या सर्व वादादरम्यान कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीर अशीही केली. यानंतर हा वाद अधिक चिघळला, वाढला. कंगनाच्या या मतानंतर बॉलिवूड आणि समाजाच्या विविध स्तरांवरून प्रतिक्रिया आल्यात.

कंगनाचं मत चुकीचं असल्याचं सर्वांचं म्हणणं ठरलं. त्यावर बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनीदेखील आपली भूमिका मांडली आहे. यामध्येच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने भाष्य केले आहे.

त्याचबरोबर मला महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे सुरक्षित वाटते, असे तो एका मुलाखतीदरम्यान म्हणाला आहे. कोणाचीही बाजू मी घेत नाही. पण महाराष्ट्रात मला खरच फार सुरक्षित वाटते.

मी खुलेपणाने येथे माझे मत मांडू शकतो. ज्या गोष्टी गेल्या काही काळापासून घडत आहेत. त्या पाहून माझी शिवसेनेप्रती प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे हे घडले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मतांशी मी सहमत नसेलही, पण मला महाराष्ट्रात कायम सुरक्षित वाटते, असे अनुराग कश्यप म्हणाला. पुढे तो म्हणतो,

सध्या पाहायला गेले तर सरकार लोकांचे लक्ष खऱ्या मुद्द्यांवरुन बॉलिवूडकडे केंद्रित करत आहे. काँग्रेस समर्थक मी नाही, पण सध्या सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, त्याचा विरोध मी करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment