सरपण गोळा करत असताना, अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून फरपटत नेऊन बलात्कार

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर – सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिला फरपटत आडोशाला नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने संभोग करुन बलात्कार केला. ही घटना संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर खंडोबा डोंगराच्या गडदीच्या लवणात घडली. 

कळालेल्या माहितीनुसार, या भागात जवळे बाळेश्वर परिसरात राहणारी एक १५ वर्षाची अल्पवयीन मुलगी तिच्या मुकी व बहिरी असलेल्या नातेवाईक महिलेबरोबर सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. 

सरपण गोळा करत असताना मुकी व बहिरी नातेवाईक महिला थोडी आडबाजूला गेली असता त्याचवेळी अचानक १५ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीपेक्षा वयाने मोठा असलेला एक तोंडाला रुमाल बांधलेला आरोपी तरुण मुलगा तेथे आला व अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिला फरपटत आडोशाला नेले व तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने संभोग करुन बलात्कार केला. 

पिडीत मुलीच्या आईला चार दिवसापूर्वी हा प्रकार समजला. तेव्हा अल्पवयीन मुलगी ही गरोदर असल्याचे समजून आले. तेव्हा काल या प्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन तोंडाला रुमाल बांधलेल्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा पोस्को कायद्यांतर्गत घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

घटनास्थळी डिवायएसपी पंडित, पोनि भुसारे यांनी भेट दिली. सपोनि बोरसे हे पुढील तपास करीत आहेत. सरपण आणायला गेलेली अल्पवयीन मुलगी नराधम आरोपीची शिकार बनली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment