file photo

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध देखील लादण्यात आले आहेत. यातच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

राहुरी तालुक्यात करोनाच्या रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता केंदळ खुर्द गावाने स्वयंस्फूर्तीने लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

या कालावधीत कोरोना नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती सरपंच यांनी दिली आहे.

राहुरी तालुक्यामधे करोना रूग्णांमधे झपाट्याने वाढ होत. त्यामुळे आता प्रशासनाने देखील कडक पाऊले उचललेली आहेत.

यासाठ तालुक्यातील पुर्व भागातील केंदळ खुर्द येथील ग्रामस्थांनी २ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत दुपारनंतर लाॅकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू रहातील. तर दुध संकलन केंद्र सकाळी ६ ते ८ तर सायंकाळी ६.३० ते ७.३० पर्यंतच चालु राहतील.

या व्यतिरीक्त ४ व्यक्तीपेक्षा जास्त गर्दी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच माच्छिंद्र आढाव यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|