file photo

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढ लागू करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांनी दिली.

थोरात कारखान्यावर झालेल्या लक्ष्मीपूजन कार्यक्रम प्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वेतनवाढीची घोषणा केली. अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, संचालक इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते.

थोरात कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चालू हंगामात १३ लाख १९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने आर्थिक शिस्त, पारदर्शकता व काटकसर त्रिसूत्री जपत उच्चांकी भाव देण्याची परंपरा कायम राखली. कार्य क्षेत्राबाहेरील सभासदांचा विश्वास सार्थ ठरवला.

कामगारांचे हित जोपासत राज्यातील साखर कामगारांना वेतन वाढीचा निर्णय झाल्याने त्याची अंमलबजावणी करत १२ टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीला २० टक्के बोनस व ३० दिवसाचे सानुग्रह अनुदान कामगारांच्या खात्यावर जमा केले.

कारखाना व्यवस्थापनाने घेतलेल्या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे अमृत कामगार युनियन संघटनेकडून अध्यक्ष किशोर देशमुख, संपत गोडगे, मिनानाथ वर्पे, घूगरकर, केशव दिघे, राजेंद्र कढणे, बाळासाहेब फापाळे आदींनी मंत्री थोरात यांचा सत्कार केला.