Ahmednagar City

महापालिकेचे ‘ते’ कर्मचारी अखेर निलंबित !

अहमदनगर :- कामावर हजर न झालेल्या २१ कर्मचाऱ्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मनपासमोर धरणे आंदोलन केले होते. घनकचरा विभागाने कामाच्या सोयीसाठी २१ कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश दिले होते.

पूर्वसूचना न देता परस्पर कामावर गैरहजर राहिल्याने…

बदली आदेशानुसार रुजू होण्यास नकार दिल्याने प्रशासनाने त्यांना कामावर हजर होण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या. ते कामावर रुजू न झाल्याने घनकचरा विभागाने तसा अहवाल सादर केला होता. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता परस्पर कामावर गैरहजर राहिल्याने या कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे आदेशात म्हटले आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close