Ahmednagar CityBreaking

आमदार जगताप पिता-पुत्र अडचणीत !

अहमदनगर :- भाजपचा महापौर होण्यासाठी जगताप यांच्या आदेशानेच नगरसेवकांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर नाराजी व्यक्त केली असून जगताप पितापुत्रांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

राजकीय अडचणी वाढल्या !

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप व त्यांचे पुत्र नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या पिता-पुत्रांसमोरील राजकीय अडचणी वाढल्या आहेत.

आ.संग्राम जगताप यांचे तिकीटही धोक्यात ?

राष्ट्रवादीने महापालिकेत भाजपचा महापौर केल्याने लोकसभा निवडणुकीसाठी आमदार अरुण जगताप यांचे नाव बाजूला ठेवले आहे तर आमदार संग्राम जगताप यांचेही विधानसभेचे तिकीटही धोक्यात आल्याचे मानले जात आहे.

जगताप पिता-पुत्रांना आमंत्रण नाही.

लोकसभेच्या नगर मतदार संघाच्या मुंबईतील चर्चेच्या वेळी नगर शहराचा या मतदार संघात समावेश असूनही जगताप पिता-पुत्रांना आमंत्रण दिले नव्हते. मागच्या अशाच पहिल्या आढावा बैठकीत नगरमधून पक्षाद्वारे आमदार अरुण जगताप यांचे एकमुखी नाव पुढे आले होते.

लोकसभेसाठी आता ही तीन नावे चर्चेत.

दोन दिवसांपूर्वीच्या दुसऱ्या आढावा बैठकीत जगतापांऐवजी आता माजी आमदार दादा कळमकर व नरेंद्र घुले तसेच प्रताप ढाकणे यांची नावे चर्चेत घेतली गेल्याने जगतापांच्या दृष्टीने हा मोठा धक्का मानला जात आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button