नगर शहरातील उच्चभ्रूं’च्या वसाहतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !

अहमदनगर :- नगर शहरातील सावेडी भागात असणार्‍या महाविरनगरमध्ये ‘ उच्च भ्रूं’च्या वसाहतीमध्ये एका बंगल्यास छुप्या पध्दतीने सुरु असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 
रत्नप्रभा नावाच्या बंगल्यात वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे येथील तोपखाना पोलिसांना मिळाली होती. तोफखाना पोलिसांनी छापा टाकून दोन पुरुष व चार महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी सांगितले. 
Related Posts
Loading...
दरम्यान, या कारवाईमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. सावेडी रोडवर असलेल्या महावीरनगरमध्ये एका बंगल्यात वेशा व्यवसाय चालत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे येथील तोफखाना पोलिसांना मिळाली होती. 
पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहिती घेतली असता या ठिकाणी काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ छापा टाकून चार महिलांसह दोन पुरुषांना ताब्यात घेतले आहे. 
ज्या बंगल्यात हा व्यवयास सुरु होता, त्या बंगल्याच्या मालकाची माहिती पोलिसांनी घेतली असून, त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. या संदर्भात तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.