नगरची मतदान यंत्र तडकाफडकी बदलली.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- नगर जिल्ह्याला प्राप्त झालेले आणि प्रात्यक्षिके पूर्ण होऊन मतदानासाठी सज्ज झालेली यंत्रे निवडणूक आयोगाने तडकाफडकी बदली करण्याचा घाट घातला आहे.

नगर जिल्ह्याकडे असणाऱ्या सध्याच्या ईव्हीएम मशिन या इतर जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार आहेत.

हैद्राबाद येथून नव्याने तयार झालेल्या मशिन आणण्याची सूचना निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. लोकसभा निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात.

या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या आणि मतदानासाठी सज्ज असलेली मतदान यंत्रे बदलून त्याठिकाणी नवीन मतदान यंत्रे उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याप्रकारामुळे जिल्हा निवडणूक शाखेत धावपळीचे वातावरण आहे. निवडणून आयोगाने नव्याने देण्यात येणाऱ्या मतदान यंत्रावरील सर्व प्रक्रिया 25 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे अधिकारी गोंधळात पडले आहे. त्यातच या शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांची बदली होणार आहे. त्यामुळे नव्याने येणारे मतदान यंत्रे हातळायची, कशी अशी चिंता जिल्हा प्रशासनाला पडली आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी वेगवेगळी वैशिष्ट्‌ये असलेली नवीन एम-3 श्रेणीची मतदान यंत्रे (ईव्हीएम) वापरण्यात येणार आहेत.

नगर जिल्ह्यासाठी एम-3 प्रकारचे 8 हजार 20 बॅलेट युनिट, 4 हजार 663 कंट्रोल युनिट व 4 हजार 663 व्हीव्हीपॅट भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड बेंगळुरूकडून प्राप्त झाली होती.

Leave a Comment