BreakingMaharashtra

न्याय मिळावा, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी मयत शिंदे कुटुंबीयांची मागणी.

अहमदनगर :- सनी शिंदे या युवकाचा खून करुन, सदर प्रकरण मागे घेण्यासाठी संबंधीत आरोपी कुटुंबीयांना धमकावून मानसिक पिळवणुक करीत असताना त्यांना पोलीस प्रशासन पाठिशी घालत असल्याने इच्छा मरणाची परवानगी मिळण्याची मागणी शिंदे कुटुंबीयांनी केली.

या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार माधुरी आंधळे यांना देण्यात आले. यावेळी शरद शिंदे, रेखा शिंदे, नंदा घोडके, बाळासाहेब शिंदे, अरुण घोडके, संदीप शिंदे उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, माझा मुलगा सनी शरद शिंदे याचा 2015 मध्ये निर्घुण खून करण्यात आला.

सदर प्रकरण बीड न्यायालयात चालू आहे. यासाठी आंम्हाला वेळोवेळी न्यायालयात जावे लागते. ही केस मागे घेण्यासाठी तसेच या खटल्यात हजर राहू नये यासाठी अफजल शेख, इम्रान शेख, नगरसेवक मुदस्सर शेख हे दबाव आनत आहे.

तसेच रस्त्यात अडवून मारहाण तरजातीवाचक शिवीगाळ करुन आमच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप शिंदे कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी होऊन आरोपींची नार्को टेस्ट केल्यास यामधील अर्थकारण व खुनाचा रचलेला कट उघडकीस येणार आहे.

सनी शिंदे या युवकाचा खुन होण्यापुर्वी तीच्या आईने सनीच्या जिवीतास धोका असल्याची तक्रार दिली होती. मात्र या तक्रारीकडे पोलीसांनी लक्ष न दिल्याने त्याचा जीव गेला आहे. संबंधीत आरोपींची दहशत असल्याने त्यांच्यावर कारवाई न करता आमच्या कुटुंबीयांवरच खोट्या केसेस दाखल केले जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी सीआयडी चौकशी करुन आरोपींची नार्को टेस्ट करुन न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा इच्छा मरणाची परवानगी शिंदे कुटुंबीयांनी मागितली आहे. तसेच परिवारातील सदस्यांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास संबंधीत आरोपी जबाबदार असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button