Ahmednagar SouthBreaking

घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी अधिकारी व खा.गांधी यांनी केली जागेची पाहणी.

अहमदनगर :- पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून लॅण्ड पुलिंगद्वारे संयुक्त भागीदारी तत्वावर घरकुल वंचितांचा प्रकल्प साकारण्यासाठी म्हाडाचे नाशिक विभागाचे मुख्य अभियंता दिनेश श्रेष्ठ, घनश्याम सोनार व खासदार दिलीप गांधी यांनी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळासह सोमवारी निंबळक, इसळक शिवारातील खडकाळ पड जमीनीची पहाणी केली.

यावेळी कॉ.बाबा आरगडे, अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे, इसळकचे सरपंच रावसाहेब गेरंगे, बाळासाहेब पोटघण, विठ्ठल सुर, शाहीर कान्हू सुंबे, शिवाजी खामकर, रघुनाथ आंबेडकर, सखुबाई बोरगे, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, संगीता घटे, सुमन जोमदे, आश्‍विनी रोकडे आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

म्हाडाचे अधिकारी दिनेश श्रेष्ठ यांनी सदर जागा घरकुल प्रकल्पासाठी उपयुक्त असून, शासनाकडे प्रस्ताव सादर करुन हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 500 स्के. फुट जागेवर 325 स्के फुट बांधलेल्या घरांचा स्वरुप रो-हाऊसिंग पध्दतीने असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विलास लामखडे यांनी या परिसरातील जमीन उपजाऊ नसल्याने घरकुल वंचितांचा प्रकल्प उत्तमपणे साकारला जाणार असून, एमआयडीसी जवळ असल्याने रोजगाराचा प्रश्‍न देखील सुटणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित जागा मालक सुरेंद्रसिंग धुप्पड व भिमराव कानडे यांनी या प्रकल्पासाठी जागा देत असल्याचे जाहिर केले.

तर या प्रकल्पाला इतर शेतकरी जागा देण्यास तयार असल्याचे सांगितले. खा.दिलीप गांधी यांनी गोरगरीबांचे हित पहाणारे सरकार सत्तेवर आले असून, लवकरच घरकुल वंचितांचा प्रश्‍न मार्गी लावण्यात येणार आहे. 2022 पर्यंन्त सर्वांना घरे देण्याचा सरकारचा मानस आहे. इसळक, निंबळक येथे पुर्ण नियोजन करुन नवीन नगर वसविण्यात येणार आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून घरकुल वंचितांच्या घरांचा स्वप्न साकार होणार असल्याचे सांगून, घरांचा प्रकल्प उभारण्यासाठी व मुलभूत सुविधा निर्माण करुन देण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. तर हा पायलेट प्रोजेक्ट राज्यासह देशाला उत्कृष्ट ठरणार असल्याचे आश्‍वासित केले. 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button