Ahmednagar SouthBreaking

सुजय विखे VS संग्राम जगताप होणार फाईट!

अहमदनगरमधून लोकसभेसाठी भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध संग्राम जगपात यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे नगर शहरमधून सध्याचे आमदार आहेत. शिवाय त्यांचे वडील अरुण जगताप हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार आहेत.

तर भारतीय जनता पक्षाकडून डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याने नगरमध्ये आता संग्राम विरूद्ध सुजय असा दोन युवा नेत्यांमध्ये सामना रंगणार आहे.

नगरच्या उमेदवारीवरूनचा आघाडीचा वाद दीर्घकाळ रंगला. या जागेवर विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय इच्छूक होते. त्यांच्यासाठी राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी होत होती. मात्र, राष्ट्रवादीने अखेरपर्यंत ही जागा सोडली नाही. त्यामुळे डॉ. विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी खासदार यशवंत गडाख यांचे सुपुत्र प्रशांत गडाख यांचं आणि विखे घराण्याचं वैर आहे. त्यामुळे त्यांचीही ताकद संग्राम जगतापांच्या मागे उभी राहू शकते.संग्राम जगताप दोन वेळा नगरचे महापौर होते.

संग्राम जगताप यांना उमेदवारी दिल्यामुळे नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप असा दोन तरुणांचा सामना होईल. अशावेळी शिवाजी कर्डिले हे लेकीच्या नवऱ्याला मदत करणार की काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या सुजय विखेंना मदत करणार असा प्रश्न आहे.

यावेळच्या महापालिका निवडणुकीत महापौर निवडीच्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने जगताप अडचणीत आले होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी त्यांना पत्कारवी लागली. त्यांच्या नगरसेवकांना पक्षाने बडतर्फही केले.

तर संग्राम जगताप यांनाही जाब विचारला होता. पण यानंतरही संग्राम जगताप यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button