Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingMaharashtra

आ. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ‘स्टार’ प्रचारक !

संगमनेर :- आगामी लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली.

देशात व महाराष्ट्रात सध्या लोकसभेची धाम धूम सुरु असून काँग्रेस पक्षाच्या वतीने देशातील व महाराष्ट्रातील दिग्गज नेते प्रचारात सहभागी होणार आहेत.

यामध्ये  सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष खा.राहूल गांधी, सरचिटणीस पियंका गांधी, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांसह  आ.बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे.

 काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिकपणामुळे त्यांची काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या अशा राष्ट्रीय वर्किंग कमिटीत कायमस्वरुपी सदस्य म्हणून निवड झाली आहे. 

विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण या विभागातील सर्व प्रश्‍नांची जाण व सामान्य नागरिकांशी थेट संवाद यामुळे येत्या लोकसभा निवडणूकीतील प्रचाराच्या रणधुमाळीत थोरात हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असणार आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button