तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? असे करा चेक…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. 11 एप्रिलपासून सात टप्प्यात मतदान होणार आहे. 23 मे रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगानेही सर्व तयारी पूर्ण केली आहे. 

मात्र, मतदार म्हणून आपलीही जबाबदारी आहे की, आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही, हे आताच तपासून घेणं. याचं कारण मतदान करणं आपला हक्क आहे. त्यामुळे मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा

सर्वप्रथम http://103.23.150.139/marathi/ या साईटवर क्लिक करा.

तुम्हाला Name Wise आणि ID Card Wise असे दोन पर्याय दिसतील.

पहिला पर्याय :

तुम्ही Name Wise या पर्यायावर क्लिक करुन District पर्यायावर क्लिक केल्यास – त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याचं नाव, तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव आणि दिलेल्या संख्येची बेरीज असे पाच कॉलम भरावे लागतील. त्यानंतर Search पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, ते दिसेल.

तुम्ही Name Wise या पर्यायावर क्लिक करुन Assembly पर्यायावर क्लिक केल्यास – त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याचं नाव, मतदारसंघाचं नाव, तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव आणि दिलेल्या संख्येची बेरीज असे पाच कॉलम भरावे लागतील. त्यानंतर Search पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, ते दिसेल.

दुसरा पर्याय :

तुम्ही ID Card Wise या पर्यायावर क्लिक करुनही तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, ते तपासू शकता. त्यासाठी ID Card Wise केल्यानंतर जिल्हा निवडावा लागेल, त्यानंतर मतदान ओळखपत्र क्रमांक टाकावा लागेल आणि दिलेल्या संख्येची बेरीज टाकावी लागेल, त्यानंतर Search पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, ते दिसेल.

मतदार यादीत तुमच्या नावाचे अनेक पर्याय दिसल्यास काय कराल?

सर्व माहिती भरल्यानंतर अनेकदा एकाच नावाचे अनेक पर्याय दिसतात. अशावेळी तुमचा गोंधळ होऊ शकतो. मात्र, गोंधळण्याचं कारण नाही. तुम्हाला जर अनेक नावं दिसली, तर त्या नावांच्या पुढे VIEW PDF नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक पीडीएफ फाईल उघडेल, त्यात सर्वात खाली तुम्हाला तुमचा पत्ता दिसेल. त्यावरुन तुम्हाला लगेच लक्षात येईल, अनके पर्यायांमधील नेमकं तुमचं नाव कोणतं.

एक लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व माहिती इंग्रजीत भरावयाची आहे. त्यामुळे स्पेलिंग चुकता कामा नये. स्पेलिंग चुकल्यास अर्थात तुमचं नाव शोधताना अडचण येईल.

Leave a Comment