Ahmednagar CityBreaking

संग्रामच्या डोक्यात कधी हवा जाणार नाही – खा.शरद पवार.

नगर: “नगरचा उमेदवार कसा असावा, हे ठरवतांना मी विचार केला की, उमेदवार नम्र असावा, आलेल्यांशी माणुसकीने वागणारा, मिळालेल्या पदाची व अधिकाराची हवा डोक्‍यात गेलेली नसावी. यासर्वांचा विचार करुन तरुण कार्यकर्त्यास नगर दक्षिणची उमेदवारी दिली. 

संग्रामच्या डोक्यात कधी हवा जाणार नाही. नगर मतदारसंघात माणसाला माणुसकीने वागविणारा संयमी उमेदवार हवा होता, म्हणून त्याला उमेदवारी दिली आहे,’ अशा शब्दात आ.संग्राम जगताप यांचे कौतुक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

आता जनतेने ही निवडणूक हातात घेऊन या विकासाचा दृष्टिकोन असलेल्या उमेदवारास निवडून द्यावे,’ असे आवाहनही यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या नियोजनासाठी शरद पवार थांबले होते. सायंकाळी बडीसाजन मंगल कार्यालयात अहमदनगर शहर व्यापारी मंडळातर्फे आयोजित शहरातील व्यापारी उद्योजकांच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले.

जयंत पाटील, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, पुणे मर्चंटस्‌ असोसिएशनचे अध्यक्ष पोपट आस्तवाल, वालचंद संचेती, राजेश फुलपगार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अरुण जगताप, आमदार सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, उमेदवार आमदार संग्राम जगताप, निरीक्षक अंकुश काकडे, निवृत्ती आरू, सुजित झावरे आदी उपस्थित होते.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close