Lifestyle

उन्हाळ्यातही कूल रहायचे असेल हे नक्की वाचा !

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या उन्हापासून वाचण्यासाठी शरीराला आंतर्बाहय़ थंड ठेवणं आवश्यक आहे. यासाठी नेमकं काय केलं पाहिजे?

उच्च तापमान आणि हवेत असलेली आद्र्रता यामुळे हा उन्हाळा अधिकच तापदायक होऊ लागला आहे. शरीराच्या आंतर्बाहय़ उष्णतेमुळे लोकांना डोकेदुखी, थकवा येणे, चक्कर येणे अशा उष्णतेच्या विकारांचा सामना करावा लागतोय.

थोडासा आराम, शरीराला थंड वातावरणात ठेवणे आणि हायड्रेट ठेवणे यामुळे या विकारांवर मात करता येते. मात्र हीट स्ट्रोक हा अतिशय गंभीर आणि दखल घेण्याजोगा आजार आहे.

त्वचा कोरडी होणे, तापमान वाढणे आणि कधी कधी अबोधावस्थेतही जाऊ शकतो. हे सगळं टाळायचं असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराला उष्ण तापमानापासून दूर ठेवणं आवश्यक आहे. यासाठी नेमकं काय करायला हवं?

उन्हाळ्याच्या सुट्टीत कित्येकदा खेळण्यासाठी, कित्येक वेळ बाहेर फिरावं लागल्याने सूर्याच्या प्रखर किरणांचा सामना करावा लागतो. म्हणूनच अशा वेळी काही काळजी घेणं आवश्यक आहे. सनस्क्रीन लावणे हा पर्याय तर तुम्हाला माहिती आहेच; पण त्याव्यतिरिक्त अन्य काही पर्यायही आहेत.

ही वेळ टाळा

सकाळी दहा ते दुपारी ४ वाजेपर्यंत शक्यतो घरातून बाहेर पडणं टाळा. कारण या वेळेत सूर्याची किरणं प्रखर असतात. तसंच महत्त्वाचं काम असेल तर कॉटन अर्थात सुती कपडे घाला. टोपी आणि गॉगलचा वापर करा.

भरपूर पाणी प्या

लक्षात ठेवा, भरपूर पाणी प्या. मात्र पाण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक घेणं टाळा. साखर मिश्रित पेय टाळावीच.

बाळांसाठी

बाळांना हलके वजनाचे कपडे घालावेत. लांब हाताचे आणि पायाचे सुती शर्ट-पँट घाला. बाळाची पावलंदेखील बंद करून ठेवा. अंगावर पांघरूण घालतानादेखील ते कमी वजनाचं असेल याकडे लक्ष द्या. त्वचेच्या उघडय़ा पडलेल्या भागावर हलकंसं सनस्क्रीन लावा. मोकळ्या ठिकाणी फेरफटका मारायला बाळाला घेऊन जा.

आणखी काय काळजी घ्याल?

काहीही खाण्याअगोदर साबणाने आणि कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवावेत.

खाद्यपदार्थ आणि पेय वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये ठेवावं.

पटकन खराब होणारे पदार्थ दोन तासांपेक्षा अधिक वेळ बाहेर ठेवू नका.

जेव्हा बाहेरचं वातावरण तप्त असेल तर एक तासापेक्षा अधिक वेळ खाद्यपदार्थ बाहेर ठेवू नये.

आणखी काही

शक्यतो घरातच राहण्याचा प्रयत्न करा. एसी असल्यास एसीत बसण्याचा प्रयत्न करा. मात्र घरात एसी नसेल तर शॉपिंग मॉल किंवा लायब्ररीसारख्या ठिकाणी आवर्जून जा. काही वेळ एसीच्या ठिकाणी घालवा. जेणेकरून तुम्ही पुन्हा उन्हात जाल तेव्हा तुमचं शरीर थंड राहील.

तुम्हाला जसं गरम होतं, तसंच तुमच्या पाळीव प्राण्यांनाही गरम होतं. म्हणूनच त्यांना वाहनांच्या अधिक जवळ नेऊ नका. पाळीव प्राण्यांसाठी एखादी शेड असेल आणि त्यांना पिण्यासाठी थंड आणि स्वच्छ पाणी मिळेल हे लक्षात ठेवा.

पंख्यामुळेही तुम्हाला हायसं वाटू शकतं. मात्र जेव्हा आजूबाजूला भरपूर प्रमाणात उष्णता असेल तेव्हा मात्र पंख्याचं वारंदेखील कमी पडतं. म्हणूनच थंड पाण्याने अंघोळ करा. थंड जागी राहण्याचा प्रयत्न करा.

सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत कमीत कमी बाहेर पडावं लागेल याची काळजी घ्या. सावलीत राहण्याचा प्रयत्न करा.

दिवसभरात पाच कप ताजी फळं आणि भाज्यांचं सेवन करा.

पालकांनी लहान मुलांना फळांचा ताजा रस, नारळपाणी, ताक आणि लिंबाचं सरबत द्यावं म्हणजे घामाच्या वाटे शरीराबाहेर पडलेले क्षार त्यातून मुलांना मिळतील आणि ती ताजंतवानं ठेवतील.

» पिझ्झा, बर्गर आणि पास्ता यांसारख्या मसालेदार पदार्थापासून मुलांना दूरच ठेवा. त्यापेक्षा कलिंगड, चिकू, किवी अशी फळं द्या. या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असल्याने ती अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतात.

» चांगले शेजारी व्हा. आजूबाजूला कोणी म्हातारं माणूस असेल तर त्यांना काही होत नाही ना हे तपासा.

» तुमचे पाळीव प्राणी घराच्या बाहेर असतील तर ते सावलीत आहेत ना, त्यांना पिण्यासाठी पाणी आहे ना याची काळजी घ्या.

» कुत्र्याच्या अंगावरचे केस उन्हाळ्यात थोडे कमी करा.

» कॉफी, चहा किंवा कॅफीन आणि अल्कोहोल असलेले पदार्थ वज्र्य करा.

» उन्हाळ्यात कित्येक जण बराच वेळ एअर कंडिशनचा वापर करतात. त्यामुळे पॉवर जास्त लागण्याचा धोका असतो. म्हणून एअर कंडिशनमधून वेळोवेळी व्हॅक्यूम बाहेर काढा. म्हणजे पॉवर शॉर्टेज होणार नाही.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button