Breaking

भाजपचा नगर जिल्ह्यतील विजयश्री खेचून आणणारा योद्धा-प्रसाद ढोकरीकर

कर्जत तालुका पहिल्यापासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. परंतु आपल्या रणनीतीने स्थानिक राजकारणातील गटबाजी आणि नेत्यांच्या सोयीच्या राजकारणात तो कधी भाजपाकडे गेला हे लक्षातच आलं नाही.

अर्थातच, या कर्जत तालुक्यातील पंचवीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील तयार झालेलं एक समीकरण कुणी विसरू शकत नाही. ते समीकरण आहे, आपल्या 27 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील एका भाजप सरचिटणीसाची आणि त्यांच्या उपस्थितीत भाजपाला आश्चर्यकारकपणे मिळणाऱ्या विजयाचं.

हा नशीबवान कार्यकर्ता म्हणजे श्री प्रसाद बापूसाहेब ढोकरीकर. प्रसाद ढोकरीकरांचे भाजपातील वरिष्ठ पातळीवरचे राजकीय वजन सर्वश्रुत आहे, ते काही कुणाच्या मेहरबानी मुळे नव्हे तर त्यांच्या अचूक वेळेमुळे आणि आपल्या निर्णय यांच्या जोरावर भाजपने खासदार पातळीपर्यंत खेचून घेतलेल्या विजयांमुळेच !

सध्या भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर दक्षिण मतदार संघाचे जिल्हा संघटन सरचिटणीस म्हणून काम पाहणारे नगर जिल्ह्यातील भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जातात. मागील 25 वर्षांपासून आमदार सदाशिव लोखंडे आणि नामदार राम शिंदे आणि भाजपचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांना नशीबवान ठरणारे तसेच आपल्या नियोजन बद्ध कार्यपद्धतीमुळे कर्जतच्या भाजपासाठी प्रसाद ढोकरीकर नशीबवानच ठरले आहेत.

अगदी मतमोजणी वेळी हा नशीबवान कार्यकर्ता मतमोजणी केंद्रावर उपस्थित असला तरी रिंगणातील उमेदवाराला आपला विजय निश्चित असल्याचे संकेत मिळतात आणि तो समाधानी होतो. 

आता येऊ घातलेल्या २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघ महाराष्ट्रात प्रतिष्ठेचा करण्यात आला आहे. या मतदार संघाच्या संयोजक पदाची धुरा ढोकरीकरांकडे सोपवलीय, ती त्यांच्या निष्ठावंत कारकिर्दीला विचारात घेऊनच.

महाराष्ट्र शासनाच्या पणन आणि कृषी समन्वयक समिती उपजिल्हा रुग्णालयाचे रुग्ण कल्याण समितीचे सदस्यत्व तसेच कर्जत मधील विश्वकर्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद देखील ते प्रभावीपणे निभावत आहेत नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाच्या ताब्यात आलेल्या दोन पालिकांच्या विजयात देखील कर्जत तालुक्यातील या कर्तुत्ववान नेत्याचा मोठा वाटा आहे.

या दोन्ही पालिकांच्या निवडणुकांमध्ये निरीक्षक पदाची धुरा सांभाळताना उमेदवार निवडीपासून प्रचारसभांपर्यंतचे सर्व नियोजन प्रसाद ढोकरीकरांनी अगदी चोखपणे बजावले आणि आता या पालिकांवर भाजपाचेच कमळ फुललंय.

कर्जत जामखेड विधानसभेला प्रत्येक आमदाराच्या वतीने प्रतिनिधित्व विश्वासाने सोपवलं जातं ते प्रसाद ढोकरीकर यांच्याकडेच. नगर परिषदांमधील उमेदवार निवड असो, भव्य राजकीय सभा असो, प्रचार दौरा असो किंवा पदयात्रा असो जिल्ह्याच्या पक्षश्रेष्ठींमध्ये विश्वास आणि आदरानं नाव घेतलं जातं प्रसाद ढोकरीकरांचं !

अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राम शिंदे खासदार दिलीप गांधी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांच्या तोंडी कायम प्रसाद ढोकरीकरांच्या कौतुकाचेच बोल असतात.

अशा या कर्जतच्या नशीबवान विजयश्रीकडे भाजपचे अनेक आशेची किरणं आहेत. त्याच्याच जोरावर आणि ढोकरी करांच्या रूपाने भाजपाकडे कर्जत मधील ठेवणीतील हिराच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button